मांडकीच्या भैरवनाथ यात्रेत दीडशे मल्लांची हजेरी

नीरा-नीरा नजीक मांडकी (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. मंगळवारी कुस्त्यांचा भव्य आखाडा भरविण्यात आला होता. कुस्ती आखाड्यात 150 मल्लांनी सहभाग घेतला. स्थानिक व परिसरातील मल्लांबरोबरच परराज्यातील मल्लांनी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला.
यात्रेनिमित्त पारंपरिक छबिना तसेच ग्रामस्थांनी विविध वेशभूषा करून सोंगाचा कार्यक्रम सादर केला. लोकनाट्य तमाशा पुरुष मंडळींनी मोठी गर्दी केली होती. तर ऑर्केस्ट्रा या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला गावातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. तरुणांनी मनोरंजनाचे कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. कुस्ती आखाड्याचे उद्‌घाटन यात्रा कमेटीचे अध्यक्ष दीपक जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्ती स्पर्धेत परिसरासह सातारा, कोल्हापूर, जिल्ह्यातील तसेच उत्तर प्रदेश राज्यातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतला होता. संध्याकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत 150 मल्लांनी कुस्त्यांचा आखाडा गाजवला. चितपट झालेल्या कुस्तीला हलगी वाजवून दाद दिली. कुस्ती स्पर्धेत शंभर रुपयांन पासून दहा हजार रुपयांहून अधिक रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आल्याचे यात्रा कमिटीने सांगितले.
कुस्ती आखाडा यशस्वी होण्यासाठी पोलीस पाटील प्रवीण जगताप, नारायण जगताप, अशोक जगताप, संजिवनी जगताप, राहुल जगताप, विश्वास जगताप व अशोक शिंदे यांनी परिश्रम घेतले. पै.राजैंद्र जगताप, पै.योगेश देंडे, शिवाजी साळुंखे, बाळासाहेब जगताप, नरसिंग जगताप, दिलीप जगताप व बाळासाहेब शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले. यात्रा काळात वाल्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत पार पडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)