मांजामुळे कापला गेला वकीलाचा गळा

– खासगी रुग्णालयात उपचार सुरू; मुलगाही जखमी
– यापूर्वी दोन महिलांचा मृत्यू
 
पुणे – पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजाने दुचाकीवरून घरी निघालेल्या वकीलाचा गळा कापला गेल्याची धक्‍कादायक घटना शनिवारी दुपारी वडगावशेरी येथे घडली. यात ऍड. महेश गोगावले आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. मांजामुळे यापुर्वी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

ऍड. गोगावले हे त्यांचा आठ वर्षांचा मुलगा ऋवेद याला घेऊन दुचाकीवरून फिनिक्‍स मॉलमार्गे वडगावशेरी येथे असलेल्या त्यांच्या घरी जात होते. ते सोमनाथनगर येथील रामचंद्र सभागृह येथे आले असता ही घटना घडली. मांजामुळे गळा कापल्याने ऍड. गोगावले दुचाकीवरून पडले. त्यात त्यांच्या मुलाला हात आणि पायाला जखमा झाल्या.

-Ads-

गळा कापल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे ऍड. गोगावले यांनी अपघातानंतर त्वरीत स्वत:ला सावरत जवळचे रुग्णालय गाठले. सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपाचार सुरू आहेत. पतंगासाठी वापरण्यात येणारा मांजा अनेकांच्या जीवावर बेतल्यानंतर चायनीज, नायलॉनच्या मांज्याच्या वापरावर राष्ट्रीय हरीत प्राधिकरणाने (एनजीटी) जुलै-2017 मध्ये बंदी घातली आहे. मात्र, त्याचा शहरात सर्रासपणे वापर सुरू आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)