मांजरेवाडीत पाळीव, भटकी कुत्र्यांचा मृत्यू

राजगुरूनगर – मांजरेवाडी (धर्म ता. खेड) येथे 10 ते 11 पाळीव व मोकाट कुत्री, अनेक कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मांजरेवाडी येथे चार दिवसांपूर्वी खाण्याच्या पदार्थातून कुत्री व कावळ्यांना विषबाधा झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्‍त केला आहे. पाळीव व मोकाट कुत्री मरण पावल्याने मृत्यू पावल्याने त्यांची परिसरात दुर्गंधी सुटली आहे. येथील शेतकरी बबनराव मांजरे, जयसिंग मांजरेसह इतर शेतकऱ्यांची घरची पाळीव कुत्री, व गावातील भटकी कुत्री यात मरण पावली. पावसळ्याचे दिवस असल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. घरचा राखणदार मुत्यूमुखी पडल्याने शेतकरी हळहळ व्यक्‍त करित आहे.अचानक कुत्री व कावळे मरण पाल्याच्या घटना घडल्याने कुत्री व कावळ्यांची मृत्यू नक्‍की कशाने झाला याची नागरिकांमध्ये मोठी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)