मांजरी येथील ऊस संशोधन केंद्रास महिलांची भेट

पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक 36 शेतकरी महिलांना वसंतदादा ऊस संशोधन केंद्र मांजरी येथे “ऊस शेती ज्ञानलक्ष्मी’ या विषयावरील कार्यक्रमासाठी पाठविण्यात आलेले आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. ऊस शेतीमध्ये महिलांचे योगदान वाढले असून ऊस लागवडीचे नवीन तंत्रज्ञान, ऊस जाती, खत पाणी व्यवस्थापन तसेच ऊस लागवड पध्दत, रोग किडीची माहिती असणे आवश्‍यक आहे. भीमाशंकर साखर कारखान्यामार्फत प्रशिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी प्रवेश शुल्क, प्रवास, इतर सुविधा मोफत देण्यात येते. महिला शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेऊन ऊस शेतीचे महत्व आणि तंत्रज्ञान समजून घेऊन मिळालेली माहिती उपयोग आपले एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक माऊली अस्वारे, ऊस विकास अधिकारी संदीप मोरडे, दिनकर आदक आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)