महेश शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कोरेगाव : कार्यक्रमात बोलताना महेश शिंदे, व्यासपिठावर पुरुषोत्तम जाधव, विक्रम पावसकर व इतर मान्यवर.

कोरेगाव, दि. 10 (प्रतिनिधी) – कोरेगाव-खटाव विधानसभा मतदार संघाचे भाजपचे नेते महेश शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सातारा जिल्हा युवामोर्चा सरचिटणीस रमेश उबाळे यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रबोधिनी अंध विद्यालय आणि एहसास मतिमंद मुलांच्या शाळेत खाऊ वाटप तसेच त्रिपुटी ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कोरेगाव-खटाव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी सायंकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात महेश शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप सातारा जिल्हा सरचिटणीस रमेश उबाळे, कराड उत्तर जि. प. सदस्य मनोजदादा घोरपडे, पुरुषोत्तम जाधव, निलेश नलावडे, राहुल बर्गे, श्रीकांत बर्गे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)