बारामती- सोनगाव (ता. बारामती) दरेकरवस्ती येथील अल्पवयीन महाविद्यालयीन युवती आकांक्षा दरेकर आत्महत्याप्रकरणातील आरोपी महेश मासाळ हा बुधवारी (दि. 22) रात्री साडेदहाच्या सुमारास स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला. त्यानंतर त्याला आज (गुरुवारी) बारामती न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रोडरोमिओंच्या त्रासाला कंटळून आकांक्षाने 10 ऑगस्ट रोजी विष प्राशन केल्यानंतर तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, बुधवारी सकाळी सातच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, महेश मासाळच्या त्रासाला कंटाळून आकांक्षा हीने आत्महत्या केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर मासाळच्या अटकेची मागणी करीत आकांक्षाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन आकांक्षावर शोकाकुल वातावरणात अंतिमस्कार केले. दरम्यान, परस्थितीचा अंदाज आल्याने नातेवाईकांच्या सहाय्याने आरोपी महेश मासाळ स्वत:हून बारामती तालुका पोलीस ठाण्यात रात्री साडेदाहाच्या सुमारास हजर गुन्हा कबुल करीत तो पोलिसांना शरण गेला. दरम्यान, त्यास आज न्यालयात हजर केले असता मासाळला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)