महेश बाबूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध मादाम तुसाँ या संग्रहालयामध्ये जगभरातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत व्यक्तींचे मेणाचे पुतळे संग्रहित करून ठेवण्यात येतात. या संग्रहालयात भारतातील आतापर्यंत महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय, रजनीकांत आणि सचिन तेंडूलकर या व्यक्तींचे पुतळे आहेत. यामध्ये आणखी एका व्यक्तीने आपली जागा बनवली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या  ‘भारत अने नेनू’ चित्रपटाचा मुख्य अभिनेता महेश बाबू याचाही मेणाचा पुतळा आता मादाम तुसाँमध्ये ठेवण्यात येणार आहे.

महेश बाबूची लोकप्रियता पाहत मादाम तुसाँ संग्रहालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती महेश बाबूनी स्वत: ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना दिली. यावेळी त्याने म्हंटले कि, या संग्रहालयात स्थान मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या कार्याकडे लक्ष दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. त्यासोबतच महेश बाबूनी मादाम तुसाँमधील कलाकारांचे आभारही मानले आहेत. दरम्यान, भारत अने नेनू या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दोन दिवसातच १२५ कोटींचा टप्पा पार केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)