महेश नागरीच्या संचालकांविरोधात गुन्हा

3 कोटी 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका
सातारा,दि.6(प्रतिनिधी)
महेश नागरी सहकारी पतसंस्थेत 3 कोटी 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ×ऍड. मुकुंद सारडा यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे. संशयित सर्वजण हे पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी असून 2010 ते 2016 या कालावधीतील अपहार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ऍड. मुकुंद सारडा यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मकुंद सारडा ( रा.भवानी पेठ), सुभाष लोया ( रा.लोखंडे कॉलनी), शिरीष पालकर ( रा.भवानी पेठ), सुनील राठी ( रा.सोमवार पेठ), राहूल गुगळे ( रा.प्रतापगंज पेठ), रविंद्र जाजू ( रा.शनिवार पेठ), निलेश लाहोटी (रा.प्रतापगंज पेठ), धिरज कासट ( रा.भवानी पेठ), सुरेश सारडा ( रा.भवानी पेठ), सुरेश भरमे ( रा.सोमवार पेठ), राजेश्री लाहोटी ( रा.भवानी पेठ), पदमा कासट (रा.भवानी पेठ), हेमंत कुलकर्णी (रा.शनिवार पेठ) या संशयितांवर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी लेखापाल राणी शिवाजी घायताडे ( रा.कोरेगाव) यांनी तक्रार दिली असून त्या आहेत.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2010 ते 2016 या कालावधीत महेश नागरी पतसंस्थेमध्ये संशयितांनी आपआपसात संगनमत करुन 3 कोटी, 30 लाख 37 हजार 81 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याबाबतचा लेखाजोखा झाल्यानंतर तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली.संशयितांनी संबंधित रकमेचा अपहार करुन अपहारीत रकमेच्या वसुलीबाबत जाणूनबुजून टाळाटाळ करुन हलगर्जीपणा केला आहे. पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे हे कृत्य बेजबाबदार आहे. संशयितांनी आपआपसात हितसंबंध प्रस्थापित करुन अपहार दडपण्याच्या उद्देशाने संगनमताने सभासद, ठेवीदार व सहकार खाते, शासनाची फसवणूक केली आहे. तसेच ठेवीदारांचे नुकसान केले असल्याचेही तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे. फौजदार नसीम फरास हे पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)