महेशनगरमधील अतिक्रमणे हटवली

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महेशनगर येथील चौपाटीवर अतिक्रमण कारवाई करत आली. 1 लोखंडी काऊंटर, 8 हातगाड्या, 6 टपऱ्या, एक तीन चाकी टेम्पो, 1 चार चाकी टेम्पो आदी साहित्य जप्त केले. परवानाधारकांवरही कारवाई होत असल्याचा आरोप करत काही व्यावसायिकांनी विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे सहशह अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता, 4 कार्यालयीन अधिक्षक, 8 मुख्य लिपिक, 42 मजूर, 1 महापालिका पोलीस उपनिरीक्षक, 10 मनपा पोलीस, 5 डंपर, 1 क्रेन, तसेच 1 कनिष्ठ अभियंता, 3 बीट निरीक्षक यांनी ही कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संत तुकारामनगर हा परिसर अनधिकृत हातगाड्या व टपऱ्या यांचे आगार म्हणून ओळखला जातो. महाविद्यालय, रुग्णालय यामुळे येथे अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तानच आहे. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींचेही तेथे अर्थकारण आहे. यातूनच एका विक्रेत्याने आत्महत्या केली होती. याप्रकरणी भाजपच्या एका महिला नगरसेविकेवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. तेथील अनधिकृत हातगाड्या व टपऱ्यावर कारवाई करावी म्हणून महापालिका सभेतही अनेकवेळा गोंधळी चर्चा झाली आहे. मात्र परिस्थिती “जैसे थे’ आहे. विक्रेत्यांसी चर्चा केली असता ते “हॉकर्स झोन’ बाबत प्रलंबित जागेवरुन महापालिका प्रशासनावरच ताशेरे ओढतात. कारवाईची टांगती तलवार येथील व्यावसायिकांवर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)