महू इथल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन

नवी दिल्ली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केलेल्या भारतीय संविधानाने सामाजिक अथवा आर्थिक पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी सर्व भारतीयांना समान नागरिकत्व बहाल केले असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशातल्या महू या बाबासाहेबांच्या जन्मस्थानी आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. या घटनादत्त मूलभूत हक्कामुळे प्रत्येक भारतीयाला प्रतिष्ठीत आयुष्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

सर्व नागरिकांनी विशेषत: युवावर्गाने डॉ. आंबेडकर यांनी दर्शवलेल्या बंधुत्वाच्या मार्गाचा अवलंब करायला हवा असे आवाहन त्यांनी केले.

याआधी राष्ट्रपतींनी महू इथल्या स्मारकाला भेट देऊन बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांच्या महू इथल्या जन्मस्थळी भेट देऊन बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करणारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाचे पहिले राष्ट्रपती ठरले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)