महिलेसह एकास दांडक्‍याने मारहाण

उंब्रज – किरकोळ कारणावरुन काटेवाडी, ता. पाटण येथे एकाने शिवीगाळ करुन लाकडी दांडक्‍याने मारहाण करत एका महिलेसह अन्य एक जणास जखमी केल्याची घटना गुरुवार, दि. 3 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन गणपत जरग, रा. काटेवाडी, ता. पाटण याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काटेवाडी येथील फिर्यादी सुवर्णा जरग यांना जमीन वाटून देत नसल्याचे कारणावरुन राहत्या घरासमोर सचिन जरग याने शिवीगाळ करत लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या जालिंदर आबा जरग यांनाही मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी सचिन जरग याच्यावर मारहाण प्रकरणी उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार एस. एच. मोहिते करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)