महिलेला दुचाकीस्वाराकडून लोखंडी रॉडने मारहाण

पिंपरी – कात्रज देहूरोड बायपास रोडने दुचाकीवरून जात असलेल्या महिलेला एका दुचाकीस्वाराने लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. सुरुवातीला या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर तो झिरो क्रमांकाने हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

याबाबत संगीता महेश झेंडे (वय 32, रा. झेंडे मळा, देहूगाव) यांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता झेंडे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास देहूगावकडून कात्रजच्या दिशेने बायपास रोडने जात होत्या. व्ही अॅण्ड पी नर्सरी जवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने (एम एच 12, 6639) संगीता यांच्या दंडावर लोखंडी रॉड मारला. यामध्ये संगीता गंभीर जखमी झाल्या. दुचाकीस्वाराने डोक्यावर हेल्मेट घातले होते. त्याच्याकडे काळ्या रंगाची स्पोर्ट बाईक होती. अंगावर हिरवा टी-शर्ट होता. जखमी संगीता झेंडे यांना देहूरोड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत सुरुवातीला देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे झिरो क्रमांकाने वर्ग करण्यात आला. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)