महिलेला कोंडून दागिने पळवले

पिंपरी – पाणी आणण्याच्या बहाण्याने महिलेला स्वयंपाक घरात कोंडून कपाटातील दागिने घेऊन एकजण पसार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 22) दुपारी तानाजीनगर, चिंचवड येथे घडली. या प्रकरणी रेश्‍मा सचिन बच्छाव (वय-28, रा. तानाजीनगर, चिंचवड) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत अल्बर्ट पारकर (वय-27, रा. सज्जनगड कॉलनी, रहाटणी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी (दि.22) आरोपी प्रशांत हा रेश्‍मा यांच्या घरी आला. त्याने रेश्‍मा यांच्याकडे पैशाची मागणी केली. रेशमा यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर प्रशांतने पाणी आणण्याच्या बहाण्याने रेश्‍मा यांना स्वयंपाक घराते पाठवले. त्या आत जाताच प्रशांतने दरवाजाची कडी लावून कपाटातील 28 हजार रुपये किंमतीचे दागिने जबरदस्ती चोरून नेले. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)