महिलेच्या विनयभंग प्रकरणी भोसरीच्या घरमालकावर गुन्हा

महाळुंगे इंगळे-घरात एकट्या असलेल्या चाळीस वर्षीय महिलेला गाठून घरमालकाने तिच्याशी अत्यंत अश्‍लील हावभाव करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार भोसरी येथे घडला. याप्रकरणी चाकण येथील बलुत आळीत राहणाऱ्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिसांनी गुरुवारी (दि. 21) रात्री उशिरा भोसरीच्या एका नराधम घरमालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

कैलास साहेबराव भोसकर (रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही पीडित महिला शनिवारी (दि. 2 मार्च) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या भोसरी येथे राहत असलेल्या घरी एकटीच होती. त्यावेळी घरमालक कैलास याने बाहेरून घराचा दरवाजा वाजविला असता तिने दरवाजा उघडून भोसकर याला घरात बसण्यास सांगितले.

त्यानंतर ती त्याला पाणी आणण्यासाठी किचन रूममध्ये गेली असता त्याने तिच्या पाठीमागे चोर पावलाने जाऊन तिला मिठी मारली. तू माझी झाली तर मी हा फ्लॅट तुझ्या नावावर करीन. असे म्हणत अत्यंत अश्‍लील हावभाव करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक एस. दांडगे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)