महिलेच्या तोंडावर थुंकणारा गजाआड

पिंपरी – दारात डस्टबीन पडल्याचा आवाज आल्याने घरातून बाहेर आलेल्या महिलेला तरूणाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच कानाखाली मारत तोंडावर थुंकत धमकी दिली. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सौरभ सुरेश कन्हेरे (रा. सिध्दी विनायक जिंजर, सोसायटी, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 49 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शेजारी राहतात. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास फिर्यादीच्या दारासमोर डस्टबीन पडल्याचा आवाज आला. यामुळे बाहेर आलेल्या फिर्यादी यांना आरोपी सौरभ याने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच कानाखाली चापट मारून तोंडावर थुंकला आणि धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)