महिलेच्या डोक्‍याला लावली पिस्तूल

पिंपरी – न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी आरोपीने महिलेच्या डोक्‍याला थेट पिस्तूल लावल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी येथे घडला आहे.

शिखर शरद सिंग (वय-30 रा. हिंजवडी. मुळगाव न्यू नारायण नगर, लखनऊ, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 30 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि. 10) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या मुलासोबत चहा पिण्यासाठी हिंजवडी टाऊनशिप येथे आली होती. त्यावेळी दुचाकीवर एका मुलीसह आलेल्या आरोपीने तू माझ्या विरोधात केलेले सर्व खटले मागे घे, असे म्हणत त्यांच्या बॅगेतून पिस्तूल काढून महिलेच्या डोक्‍याला लावली. तुला खल्लास करतो, अशी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)