महिलेच्या घरात घुसून तोडफोड

पिंपरी – वडिलांना मारहाण केल्याच्या रागातून तिघांनी महिलेच्या घरात घुसून तोडफोड केली. ही घटना काळेवाडी येथे गुरुवारी (दि. 6) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

या प्रकरणी लता नाना शेवरे (वय-46, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली असून वाकड पोलीस ठाण्यात कल्पना शांताराम काकुळदे (वय-44) व त्याच्या इतर तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हे फिर्यादी यांच्या घरात घुसले. आकाश काकुदळे याने तुझ्या मुलांनी माझ्या वडिलांना मारहाण केली मी तुम्हाला पाहून घेईन असे म्हणत घऱातील टिव्ही, सोफा, फ्रीज यांची तोडफोड केली. “बघून घेऊ’, अशी धमकी देत ते निघून गेले. यामुळे परिसरात देखील काही काळ दहशत पसरली होती. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)