महिलेची सव्वा लाखांची फसवणूक

पिंपरी – दिल्ली येथील एका महिलेच्या खात्यातून परस्पर पैसे काढून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक करण्यात आली.

अर्चना इंदरलाल जैसवाल (वय-41, रा. धनराज पार्क, वाकड. मूळ रा. गौतम नगर, नवी दिल्ली) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना जैसवाल या वाकडमध्ये कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करतात. यांचे ऍक्‍सिस बॅंकेमध्ये खाते आहे. अज्ञात इसमाने त्यांच्या नावाने बाराखंबा रोड, नवी दिल्ली मधील आयडीएससी बॅंकेत खाते उघडले. त्या खात्यावर अर्चना यांच्या ऍक्‍सिस बॅंकेच्या खात्यातून 95 हजार 400 रुपये वळवून घेतले. तसेच 27 हजार रुपये ई-पेमेंट सर्व्हिसेस पेमेंट गेट-वे द्वारे काढले. एकूण 1 लाख 22 हजार 400 रुपये काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)