महिलेची वीस लाखांची फसवणूक

पिंपरी – सोशल मीडियाद्वारे झालेल्या ओळखीच्या फायदा घेत एका व्यक्तीने रावेत मधील एका महिलेला 20 लाखांना फसविले. 23 ते 27 जुलै दरम्यान हा प्रकार घडला.

देहूरोड पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन भसीन, मोनिका भसीन, प्रिया भसीन, सुशांत यादव आणि अन्य एक अशा पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेने जीवनसाथी डॉट कॉमच्या साईटवर नाव नोंदविले होते. यावर अर्जून भसीन याच्याशी त्यांची ओळख झाली. यावेळी भसीन याने आपल्या दोन बहिनींची तिची ओळख करुन देत विश्‍वास संपादीत केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण परदेशातून गैरमार्गाने भारतात 72 हजार पौंड आणले असून मुंबंई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी अडविले. ते सोडविण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत 20 लाख 54 हजार सातशे रुपये उकळले. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अर्जुन पवार तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)