महिलेची छेड काढणाऱ्या मद्यपीला चोप

फलटण, दि. 25 (प्रतिनिधी) – फलटण एसटी बसस्थानकाच्या आवारात प्रवाशी महिलेची छेड काडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्यपीस नागरिक आणि रिक्षा चालकांनी चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत माहिती अशी, दुपारी दीडच्या सुमारास बोडकेवाडी, (ता. माण) येथील 28 वर्षीय मद्यपि पुण्याला जाण्यासाठी एसटी बसस्थानकाच्या पुर्वेकडील गेटमधुन मद्यप्राशन करीत आत येत होता. त्याच्यापुढे एक महिला चालत आगारात येत असताना या मद्यपिने तिची छेड काढली. ती महिला घाबरून जोरजोरात ओरडू लागली. हा प्रकार जाणारे येणारे प्रवाशी आणि बाहेर थांबणारे रिक्षा चालकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या महिलेला बाजूला सरकवून त्या मद्यपिला चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मद्यपिवर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)