महिलेचा विनयभंग करणारा पोलीस गजाआड

पुणे- शहर वाहतुक शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराने महिलेचा भर वर्दळीच्या ठिकाणी विनयभंग केल्याचा प्रकार के. के. मार्केटच्या बसस्टॉपवर बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी हवालदाराला अटक केली आहे.
संजय दिनकर कोंडे (वय 50, हांडेवाडी रोड, हडपसर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात आंबेगाव बु, येथील 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी दुपारी कसबा पोलीस चौकी ते धनकवडी असा प्रवास करत के. के. मार्केट येथे उतरल्या. बसस्टॉपवर उतरल्यावर अचानक संजय कोंडे याने महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर फिर्यादींनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून रात्री आठ वाजता त्याला अटक केली. कोंडे शहर वाहतुक शाखेत लष्कर वाहतुक विभागात कार्यरत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)