महिलेचा मृत्यू ; डॉक्‍टरवर गुन्हा

पिंपरी – पित्ताच्या खड्याच्या उपचारासाठी गेलेल्या एका गर्भवती महिलेचा डॉक्‍टरांनी दिलेल्या गर्भपाताच्या इंजेक्‍शनमुळे मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्‍टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुसया राठोड असे मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती सूर्यकांत लक्ष्मण राठोड (वय-52, रा. खळवाडी-घेरावाडी, तळेगाव दाभाडे) यांनी तक्रार दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनुसया यांना पित्ताच्या खड्यांवर औषधोपचारासाठी पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्‍टरांनी त्यांची सोनोग्राफी केली. यामध्ये त्या गरोदर असल्याचे समजले. पित्ताच्या खड्यांवर उपचार करण्यासाठी अनुसया यांना इंजेक्‍शन देऊन गर्भपात केला. यामध्ये अनुसया यांचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्‍टरांनी अनुसया यांच्या केसपेपरवर मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)