महिलेचा दगडाने ठेचून खून

यवत हद्दीत माळरानावरील घटना

यवत- दौंड तालुक्‍यातील यवत गावच्या हद्दीतील पुणे – सोलापूर महामार्गालगत असलेल्या भुलेश्‍वर स्टील कंपनीच्या पाठीमागील बाजूकडील निर्जनस्थळी असलेल्या माळरानावर महिलेच्या डोक्‍यात दगड घालून अज्ञातांकडून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. सीताई भीमराव शेगर (वय 34 वर्षे रा. यवत, सहकारनगर, ता. दौंड, जि. पुणे), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेची खबर सदानंद दोरगे यांनी यवत पोलिसांना दिली. त्यानुसार यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी करीत पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत आरोपींच्या शोधाकरिता सूचना दिल्या. लवकरच या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)