सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) – माहेरहून सोने व पैसे घेऊन येण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. विवाहितेने पती, सासूच्या विरोधात तक्रार दिली आहे.
मुळची पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथील असलेल्या युवतीचा साताऱ्यातील पिल्लेश्‍वरी नगर, शाहूपुरी येथील श्रेणिक काळे याच्यासोबत झाला. त्यानंतर श्रेणिक व त्याची आई निर्मला यांनी तुझ्या माहेरहून श्रेणिकला दिवाळीला अंगठी घेऊन ये, असे सांगितले. त्यावेळी विवाहितेने माझ्या माहेरची परस्थिती नाही, असे सांगितले. त्यानंतर चिडलेल्या सासू व पती श्रेणीक याने वारंवार छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काही दिवसांपुर्वी श्रेणीक याने तक्रारदार महिलेला माहेरी सोडले होते. त्यानंतर तो तिच्या संपर्कात राहत नव्हता. म्हणून त्याला फोन केला असता त्याने तू माहेरहून पैसे व अंगठी घेऊन ये तरच तूला नांदवतो, असे सांगितले. नंतर त्या विवाहितेने या घटनेची माहिती माहरेच्या लोकांना दिल्याने चिडलेल्या श्रेणीक व त्याच्या आईने कॅनॉलमध्ये ढकलण्याची धमकी दिली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात श्रेणीक काळे, निर्मला काळे (दोघे रा. पिल्लेश्‍वरी नगर, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)