महिलेचा खुन करुन लुटणारा चोरटा जेरबंद

दोन महिन्यांनी अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा,दि.16 (प्रतिनिधी)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण तालुक्‍यातील सालपे येथे महिलेचा खुन करुन चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोहीत उर्फ तक्‍या चिवळ्या पवार (मुळ रा. वाळवा,जि.सांगली) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्याला साताऱ्याच्या गुन्हे शाखेने सांगलीतून ताब्यात घेतला. त्याने महिलेच्या खुनाची कबुली दिली आहे.

साधारण दोन महिन्यापुर्वी सालपे गावात लघुशंकेला घराबाहेर गेलेल्या महिलेचा खुन झाला होता. घटनास्थळी कोणताच पुरावा नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी पो.नि. विजय कुंभार यांना तपासाच्या योग्य सुचना केल्या होत्या.

त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी आरोपीच्या शोधासाठी सांगली सातारा या जिल्ह्यातील आपले नेटवर्क कामाला लावले होते. रोहीत उर्फ तक्‍या चिवळ्या पवार हा सांगली येथे असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे जाधव यांना खास खबऱ्यामार्फत मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी त्याला सांगलीतून ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने सालपे येथील महिलेचा खुन केल्याची कबुली दिली आहे. घरातून लघुशंकेला आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोने चोरण्याचा प्रयत्न केला असता, तीने विरोध केल्यानेच त्या महिलेचा खुन केल्याचे तपासात समोर आले आहे.

तसेच घटनेच्या दिवशी आरोपींनी मोर्वे ता. खंडाळ या गावात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. ताब्यातीला आरोपीकडून जिल्ह्यातील आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्‍यता आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीष दिघावकर करत आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. विकास जाधव,सहाय्यक फौजदार मोहन घोरपडे,हवालदार कांतीलाल नवघणे, तानाजी माने,मुबीन मुलाणी,शरद बेबले,नितीन गोगावले,प्रवीण फडतरे,रुपेश कारंडे,निलेश काटकर,विजय सावंत,संजय जाधव यांनी सहाभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)