महिला हॉकी संघाचे राणी रामपालकडे नेतृत्व 

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा-2018 
नवी दिल्ली  – पुढील महिन्यात गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघाचे नेतृत्व अनुभवी आघाडीवीर राणी रामपालकडे सोपविण्यात आले आहे. तसेच अनुभवी गोलरक्षक सविताकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
“हॉकी इंडिया’ या संघटनेने राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी 18 खेळाडूंच्या संघाची आज घोषणा केली. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा संगम या संघनिवडीत साधला गेला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला संघाचा समावेश अ गटात करण्यात आला असून मलेशिया, वेल्स, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका हे या गटातील अन्य संघ आहेत. 4 एप्रिल रोजी सुरू होत असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघासमोर 5 एप्रिल रोजी वेल्स संघाचे आव्हान आहे.
भारतीय महिलांनी राष्ट्रकुल स्पर्धेत अखेरचे सुवर्णपदक 2002 मध्ये मिळविले होते. तर 2006 मध्ये त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर मात्र 2010 व 2014 या स्पर्धांमध्ये भारतीय महिला संघाची पाचव्या क्रमांकावर घसरगुंडी झाली. मात्र या वेळी सोनेरी इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा विश्‍वास भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपालने व्यक्‍त केला आहे.
भारतीय महिला हॉकी संघ- 
गोलरक्षक- सविता (उपकर्णधार) व रजनी एतिमार्पू,
बचावपटू- दीपिका, सुनीता लाकरा, दीप ग्रेस एक्‍का, गुरजित कौर व सुशीला चानू पुखरम्बम,
मध्यरक्षक- मोनिका, नमिता टोप्पो, निक्‍की प्रधान, नेहा गोयल व लिलिमा मिन्झ,
आघाडीवीर- राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवजोत कौर व पूनम राणी.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)