महिला स्क्वॅश संघ अंतिम फेरीत, पुरूष संघाला कांस्यपदक

जकार्ता: भारतीय महिला स्क्वॉश संघाने गतविजेत्या मलेशियाचा 2-0 असा पराभव करताना आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे तर पुरुषांच्या संघाचा उपान्त्यफेरीत पराभव झाल्याने त्यांना कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे.

महिलांच्या उपान्त्यफेरी मधिल सामन्यात जोश्ना चिनप्पाने आशियाई स्पर्धेतील 9 पदकं नावावर असलेल्या निकोल डेव्हिडचा 12-1, 11-9, 6-11, 10-12, 11-9 असा पराभव केला. तर, दीपिका पल्लीकलने एकेरीची दुसरी लढत जिंकून भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. 2014च्या आशियाई स्पर्धेत मलेशियाने भारतीय महिलांना अंतिम फेरीत पराभूत केले होते.

तर पुरुष संघाचा हॉंग कॉंगच्या संघाने 2-0 असा पराभव करताना अंतिम फेरी गाठली. मात्र, पराभव झाल्याने भारतीय संघाला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे. दरम्यान भारतिय पुरुष संघातील सौरव घोषाल, हरिंदर पाल सिंग संधु, रुमित टंडन आणि रमेश मानगावकर यांनी संघर्षपूर्ण कामगिरी केली मात्र हॉंग कॉंगच्या खेळाडूंपुढे त्यांचा निभाव लागला नाही.

खापतीमुळे चांगली कामगिरी करता आली नाही – दिपिका पल्लीकल

हॉंगकॉंग विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताच्या स्क्वॉश संघाला पराभव स्वीकारावा लागला. पण आधीच्या सामन्यांत चांगली कामगिरी केल्याने भारताला उपांत्य फेरीत पोहोचता आले. हॉंगकॉंग विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताची स्टार स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल हिच्याकडून अपेक्षा होत्या. पण तिला सामना आपल्या नावे करता आला नाही. पण या पराभवाचे कारण चांगला फॉर्म नसणे हे नव्हते, तर दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात मला चांगली कामगिरी करता आली नाही, असे तिने सांगितले.

“मी एक सेट जिंकले, पण सामना जिंकणे मला शक्‍य झाले नाही. कारण दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात मला चांगली कामगिरी करता आली नाही आणि याची मला खंत आहे. शेवटच्या साखळी सामन्यात हॉंगकॉंगविरुद्ध आमचा खेळ चांगला झाला नाही. आम्ही थोडे कमी पडलो. हॉंगकॉंगच्या खेळाडूने उत्तम कामगिरी केली, असे मत तिने व्यक्त केले.
जोश्ना चिनाप्पा सरळ सेट्‌समध्ये पराभूत झाली. ही गोष्ट फार कमी वेळा होते. उपांत्य फेरीमध्ये नक्कीच आम्ही चांगली कामगिरी करू. उपांत्य फेरीत आमचा सामना मलेशियाशी आहे. मलेशियाचा संघ जरी चांगल्या लयीत असला, तरी त्यांना उपांत्य फेरीत पराभूत करणे हे अशक्‍य नाही. त्यांना नमवण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही ती म्हणाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)