महिला सामाजीक कार्यकर्तीने उकळली 50 हजाराची खंडणी

घराच्या नूतनीकरणाचा त्रास होत असल्याची तक्रार करण्याची दिली धमकी
पुणे,दि.4 घराच्या नूतनीकरणामुळे त्रास होत असल्याची तक्रार करत एका तथाकथीत सामाजीक कार्यकर्तीने तब्बल 50 हजाराची खंडणी उकळली. या सामाजीक कार्यकर्तीविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारामती पाठक असे गुन्हा दाखल झालेल्या सामाजीक कार्यर्तीचे नाव आहे. याप्रकरणी शोभा शेंडे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पतीसह सॅलसबरी पार्क येथील ग्रीनपार्क सोसायटीमध्ये रहातात. त्यांचे पती ठेकेदार आहेत. त्यांच्या घराच्या नूतनीकरणाचा काम करायचे असल्याने त्यांनी सोसायटीकडून रीतसर परवानगी घेतली होती. मात्र त्यांच्या खालच्या मजल्यावर रहाणाऱ्या पाठक यांनी त्यांना नूतनीकरणामुळे त्रास होत असल्याचे सांगत विरोध केला होता. नूतनीकरणाचे काम सुरु केल्यावर त्यांनी फिर्यादीला पोलिसांत तक्रार देण्याचा दम भरला होता. नूतनीकरणात अडथळा नको म्हणून फिर्यादीने त्यांच्याशी बोलून प्रश्‍न मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांत तक्रार न देण्यासाठी पाठक हिने 40 हजाराची मागणी केली. तडजोडी अंती तीला 35 हजार देण्यात आले. यानंतर नूतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले. यानंतर रंग देत असताना पुन्हा त्रास होत असल्याचे सांगत पाठक हिने फिर्यादीला हॉटेलचे 4 हजार 658 रुपये बील देण्यास भाग पाडले. यानंरही पुन्हा एकदा दहा हजाराची रोख रक्कम घेतली गेली. इतके पैसे दिल्यानंतरही पाठक वारंवार फिर्यादीकडे पैशाची मागणी करत होती. यामुळे फिर्यादीने याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. यातील काही पैसे पाठक हिच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते. तक्रार अर्जाचा तपास करुन तारामती पाठक हिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्वारगेट पोलीसांनी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक उसगावकर करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)