महिला विविध क्षेत्रात अग्रेसर ठरणे हे कौतुकास्पद

उरुळी कांचन- प्रत्येक गोष्टींवर मात करून महिला विविध क्षेत्रात अग्रेसर ठरत असून ही कौतुकास्पद बाब आहे, त्यामुळे कोणीही मुलगा व मुलगी भेदभाव करू नका. कारण मुलगी समाजात आई, आजी, सुन या सर्व भूमिका पार करून समाजसेवा सुद्धा करते. त्यामुळे भविष्यकाळात सर्वांनी महिलांचा आदार केला पाहिजे, असे मत पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष तथा मावळचे आमदार संजय (बाळासाहेब) भेगडे यांनी केले.
सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या गणेश फेस्टीव्हलचे उद्‌घाटन भेगडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हडपसरचे आमदार व भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर, शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, पुणे जिल्हा बॅकेचे संचालक निवृत्ती गवारी, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, महालक्ष्मी डेव्ल्पर्सचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गोते पाटील, शिवानी बावकर, नायगावचे उपसरपंच राजेंद्र चौधरी, हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष रोहिदास उंदरे, सोरतापवाडी ग्रामपंचायत सदस्य सागर चौधरी, सोरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चौधरी, सुदर्शन युवा मित्र मंडळाचे उपाध्यक्ष सुहास चौधरी, सोरतापवाडी पुनम चौधरी, अस्मिता पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा कांचन, नियोजन समितीचे दादा पाटील-सातव, दादासाहेब फराटे, सुनिल गोते, आप्पासाहेब लोणकर, बाबासाहेब चौधरी, नानासाहेब चोरगे, एकनाथ चोरगे, बापुसाहेब लाड, प्रकाश चौधरी, गोविंद चौधरी, दत्तात्रय बरकडेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या तसेच विद्यालयात पहिला नंबर मिळवणाऱ्या व प्रत्येक रविवारी गाव स्वच्छ करणाऱ्या साक्षी चौधरी, तनया हुड, गौरी चौधरी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदर्शन चौधरी यांनी, तर मान्यवरांचे स्वागत वैभव चौधरी, सुहास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले तर बापुसाहेब लाड यांनी आभार मानले.

  • शिंदवणे रस्ता तसेच घाटात नेहमी अपघातात घडतात. त्यामुळे शिंदवणे रस्ता व घाटाची तातडीने दुरूस्ती करण्यात येईल. सोरतापवाडी हे गाव फुलांच्या बाबतीत अग्रेसर आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात असल्यामुळे या भागातू रिंगरोड जाणार नाही. यासाठी प्रयत्नशील आहे.
    -बाबुराव पाचर्णे, आमदार, शिरूर-हवेली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)