महिला बाल कल्याण समितीला दौऱ्याचे वेध

पिंपरी – दौऱ्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असताना आता महिला व बालकल्याण समितीचे सदस्य जानेवारी महिनाअखेर अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. पवनाथडी जत्रेमुळे लांबणीवर पडलेल्या या दौऱ्याला आज (शुक्रवारी) झालेल्या समितीच्या सभेत पुन्हा एकदा मंजुरी देण्यात आली. दरम्यान, दौऱ्याचा खर्च गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

विरोधात असताना भाजपचे पदाधिकारी परदेश दौऱ्याला कडाडून विरोध करत होते. दौऱ्याच्या विरोधात आंदोलने, पत्रकबाजी केली जात होती. परंतु, स्वत: सत्तेत येताच भाजप पदाधिकाऱ्यांच्या भुमिकेत मोठा बदल झाला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून देश, विदेश दौऱ्यांचा सुकाळ आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी तब्बल 16 दौरे केले असून त्यावर करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली आहे. सत्ता आल्यानंतर फुटकळ बचतीचे धोरण स्वीकारून भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. प्रत्यक्षात मात्र काटकसर व बचतीचा देखावा करून दीड वर्षांत झालेल्या दौऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.

स्मार्ट सिटीचे संचालकांचा बार्सिलोना दौरा विविध कारणांवरुन वादग्रस्त ठरला होता. त्यावरुन सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर चीनचा दौरा करुन आले आहेत. त्यावरील टीका थंड होत नाही तोच आता महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांना दौऱ्याचे वेध लागले आहेत. डिसेंबर 2018 अखेर अथवा जानेवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात दौरा करण्याचे नियोजित होते. त्याला महिला बालकल्याण समितीच्या ऐनवेळच्या सभेत मंजुरी देखील देण्यात आली होती. मात्र, महापालिकेकडून नुकतीच पवनाथडी जत्रा भरविण्यात आली होती. या जत्रेसाठी हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र, पवनाथडी संपताच पुन्हा एकदा दौऱ्यातील बदलाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दौऱ्यासाठी येणाऱ्या महिला सदस्यांकडून संमतीपत्र घेवून त्याकरिता येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास मान्यता घेण्यासाठी ठरावाची स्थायी समितीकडे शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान दीड वर्षातील महिला व बालकल्याण समितीचा हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी केरळ येथे समितीने दौरा केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)