महिला, बालक सुरक्षेबाबत राष्ट्रीय चर्चासत्र

पुणे – इंडिया पोलीस फाउंडेशन नवी दिल्ली, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट आणि पुणे शहर पोलीस आयुक्‍तालय यांच्या विद्यमाने दि.11 जानेवारी रोजी “यशदा’ येथे महिला आणि बालकांच्या सुरक्षेसंदर्भात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

दिल्ली येथील ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंटचे पोलीस महासंचालक डॉ. ए. पी. माहेश्‍वरी यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमास अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, राजेंद्र कुमार, पोलीस महासंचालक (अभियोजन) मध्यप्रदेश तसेच इंडियन पोलीस फाउंडेशनचे अध्यक्ष एन. रामचंद्रन्‌ उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटन सत्रानंतर महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, विधि व्यावसायिक, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला, पोलीस अधिकारी यांचे पाच गट पाच विषयांवर चर्चा करणार आहे. नोकरी, सार्वजनिक ठिकाण, सार्वजनिक वाहतुकीमध्ये महिलांची होणारी सतावणूक, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि “पोक्‍सो’ कायद्याची अंमलबजावणी, संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून होणारे महिला व बालकांचे शोषण व अत्याचार, महिला व बालकांचा देह व्यापारातील वापर, महिला व बालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाटी उपाययोजना “वन स्टॉप सेंटर्स’ या विषयावर चर्चा होतील. चर्चासत्रानंतर याबाबत एकत्रित आढावा तयार करुन तो महिला व बाल सुरक्षा राष्ट्रीय धोरण ठरविण्यासाठी सादर केला जाईल.

मुख्यमंत्र्यांचे हस्ते आज “भरोसा सेल’चे उद्‌घाटन
महिला, बाल आणि ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या सेवा एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी पुणे पोलीस आयुक्तलयातर्फे “भरोसा’ या नवीन सेलची निर्मीती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस आयुक्‍त के. व्यंकटेशम्‌ यांच्या उपस्थितीत बुधवारी “भरोसा’ सेवा संकुलाचे उदघाटन करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयात “भरोसा’ सेलसाठी नवीन मनुष्यबळाची तरतूद ही पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. “भरोसा’ सेवा संकुलाचे उद्‌घाटन झाल्यानंतर नेहरू ममोरियल हॉल याठिकाणी औपचारिक कार्यक्रम होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)