महिला, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा

मुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे प्रमाण वाढले आहे, न्याय व्यवस्थेत अशा प्रकरणांमध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हा निश्चितच चांगला बदल असला तरी महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार पूर्णत: रोखण्याच्या दृष्टीने शासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते,समाज आदींनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘भारतातील मुलींचे जग – सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मुलींवर होणारा अत्याचार रोखणे ही तर काळाची गरज आहेच, पण त्याचबरोबर लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण अशा गैरप्रकारांना अनेक ठिकाणी लहान मुलेही बळी पडतात. बालकांच्या प्रश्नांवर काम करताना या बाबीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)