पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा केरळ दौरा रद्द करण्यात आला आहे. स्थायी समितीने या दौऱ्याच्या खर्चाचा प्रस्ताव रद्द केला आहे. त्यामुळे 3 लाख 37 हजार 860 रुपयांची बचत झाल्याचा दावा स्थायी समिती सदस्यांनी केला आहे.
महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिला व बालकल्याण समितीचे सदस्य केरळ दौऱ्यावर रवाना होणार होते. मात्र, यापुर्वीच वृक्ष व प्राधिकरण सदस्य व अधिकाऱ्यांचा नियोजित सिक्कीम दौरा रद्द करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर वृक्ष प्राधिकरण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे स्थायी समितीने या दौऱ्याच्या नऊ लाख 53 हजार रुपयांच्या खर्चाची बचत होणार असल्याचा दावा या सदस्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण समितीचा केरळ दौरा देखील रद्द करण्यात आला आहे. हे दोन्ही नियोजित दौरे रद्द केल्याने महापालिकेचे सुमारे तेरा लाख रुपयांची बचत झाली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा