महिला बचतगटांसाठी महापालिकेचे ‘मिशन स्वावलंबन ’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांसाठी स्वयंरोजगार व विविध योजनांची माहिती मिळावी याकरीता महापालिकेकडून मिशन स्वावलंबन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारच्या अंगीकृत संस्था असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर, यासाठी 3 कोटी 3 लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे.

शहरात मोठया संख्येने महिला बचतगट कार्यरत आहेत. त्यांना या माध्यमातून विविध योजनेची माहिती प्राप्त होणे, क्षमता विकास, उद्योजकीय विकास, रोजगार संधी, बाजारपेठ जोडणी, आत्मविश्‍वास निर्माण करणे असा या योजनेचा उद्देश आहे. तसेच, याचबरोबर आर्थिक साक्षरता, रेकॉर्ड व्यवस्थापन, डिजीटल साक्षरता, व्यवस्थापन आदी बाबी करण्यास मदत मिळणार असून, यासाठीच मिशन स्वावलंबन राबवण्यात येणार आहे. यासाठी अनुभवी असलेल्या व सरकारच्या योजनेची उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्थेची थेट पद्धतीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. म्हणूनच राज्य सरकारची अंगीकृत असलेली संस्था महिला आर्थिक विकास महामंडळाने यासाठी मागील वर्षी 5 सप्टेंबर रोजी पत्राद्वारे महापालिकेला प्रस्ताव पाठवला आहे. राज्य सरकारने 2003 सालीच महामंडळाला महिला विकासाची रज्यस्तरीय शिखर परिषद म्हणून घो.िषत केले आहे. त्यांनी सादर केलेल्या महापालिकेतील प्रस्तावाला महापालिका प्रशासनाने शहानिशा करुन मान्यता दिली आहे. सादर केलेल्या प्रस्तावात 2019 ते 22 पर्यंत या 3 वर्षासाठी 3 कोटी 3 लाख रुपयाचा आर्थिक आराखडा सादर केला आहे. याबाबतचा विषय महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या पाक्षिक सभेसमोर 22 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)