महिला प्रीमियर लीग क्रिकेट : रायगड रॉकर्स, शिवनेरी पॅंथर्संची आगेकूच 

पुणे – रायगड रॉकर्स व शिवनेरी पॅंथर्सं या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. पहिल्या सामन्यात रायगड रॉकर्स संघाने सिंहगड स्टार्स संघाचा निसटता पराभव केला. तर शिवनेरी पॅंथर्स संघाने एच.पी सुपर किंग्स संघावर दणदणीत विजय मिळविताना आपली घोडदौड कायम राखली. हेमंत पाटील स्पोर्टस फाउंडेशन व भारत अगेन्स्ट करप्शन यांच्या सहयोगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यात उत्कर्षा पवार व पार्वती बकाले यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर रायगड रॉकर्स संघाने सिंहगड स्टार्स संघाचा 4 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना रायगड रॉकर्स संघाने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 156 धावा केल्या. यात उत्कर्षा पवारने 52 चेंडूत नाबाद 58, तर पार्वती बकालेने 33 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयासाठी 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सारिका कोळीच्या 80 धावा सिंहगड स्टार्स संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. आरती केदारच्या अचूक गोलंदाजीपुढे सिंहगड स्टार्स संघाचा डाव 19.4 षटकांत सर्वबाद 152 धावांत गारद झाला. केवळ 10 धावांत 5 गडी बाद करणारी आरती केदार सामनावीर ठरली. सोनाली शिंदेने 39 धावांत 2, तर शिवानी भुकटेने 48 धावांत 1 बळी घेत तिला सुरेख साथ दिली.

आज पार पडलेल्या दुसऱ्या लढतीत किरण नवगिरेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शिवनेरी पॅंथर्स संघाने एच.पी सुपर किंग्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रियांका घोडकेच्या 40 धावांसह एच.पी सुपर किंग्स संघाने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 110 धावा केल्या. शिवनेरी पॅंथर्स संघाने 18.3 षटकांत 5 बाद 111 धावांची मजल मारताना विजयाचे लक्ष्य सहज पार केले. गौतमी नाईकच्या 42 व किरण नवगिरेच्या नाबाद 26 धावांच्या खेळीने शिवनेरीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. किरण नवगिरे सामनावीर ठरली.

सविस्तर निकाल- साखळी फेरी 
रायगड रॉकर्स- 20 षटकांत 3 बाद 156 धावा (उत्कर्षा पवार नाबाद 58 (52), पार्वती बकाले नाबाद 56 (33), श्रावणी देसाई 25, मनाली जाधव 2-24, सारिका कोळी 1-31) वि.वि सिंहगड स्टार्स- 19.4 षटकांत सर्वबाद 152 धावा (सारिका कोळी 80 (50), संजना शिंदे नाबाद 24, आरती केदार 5-10, सोनाली शिंदे 2-39, शिवानी भुकटे 1-48), सामनावीर- आरती केदार, सामन्याचा निकाल – रायगड रॉकर्स संघाचा 4 धावांनी विजय.
एच. पी. सुपर किंग्स- 20 षटकांत 4 बाद 110 धावा (प्रियांका घोडके 40 (35), सई पुरंदरे 29 (44), तेजश्री ननावरे नाबाद 18 (15), सायली लोणकर 1-11, किरण नवगिरे 1-19, भूमिका उंबरजे 1-12) पराभूत वि शिवनेरी पॅंथर्स- 18.3 षटकांत 5 बाद 111 धावा(किरण नवगीरे नाबाद 26 (52), गौतमी नाईक 42 (51), प्रियांका घोडके 2-21, प्रिया सिंग 1-4, तेजश्री ननावरे 1-23) सामनावीर- किरण नवगिरे, सामन्याचा निकाल – शिवनेरी पॅंथर्स संघाचा 5 गडी राखून विजय.रोहिणी माने 1-26); सामनावीर-श्वेता जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)