महिला पोलीस आले मदतीला धावून

पुणे: खडकवासला कालव्याला गुरूवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दांडेकर पूलाजवळ भगदाड पडल्याने परिसरातील झोपड्यात पाणी शिरले. लाखो लीटर पाणी प्रचंड वेगाने झोपड्यांमध्ये घुसल्याने अनेक लोकांना बाहेर पडणेही मुश्‍किल झाले. अशातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत अनेक लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर काढण्यास मदत केली. गुडघाभर पाण्यातून लहान मुलांना आपल्या पाठीवर बसवून बाहेर काढणाऱ्या महिला पोलिसांनी कुटुंबीयांना मोठा धीर दिला.

दांडेकर पुल परिसरात कालव्याला भगदाड पडल्याने झोपडपट्टीत पाणी शिरले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, फायर ब्रिगेड, वाहतूक पोलीस, ऍम्बूलन्सच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर याठिकाणची परिस्थीती पाहून सर्वांनाच धक्का बसला. अनेक लहान मुले, ज्येष्ट नागरिक याठिकाणी अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वांनीच मदत केली. यात विशेषतः पोलीस दलातील महिला पोलिसांनी आपल्या पाठीवर लहान मुलांना उचलून दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले.

-Ads-

अनेक ज्येष्ठ महिलांनाही आधार देत बाहेर काढण्यात आले. महिला पोलिस तात्काळ मदतीला धावून आल्याने लहान मुलांच्या पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, लांबच लांब लागलेल्या रांगा कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही मोठी कसरत केल्याचे दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
301 :thumbsup: Thumbs up
41 :heart: Love
0 :joy: Joy
22 :heart_eyes: Awesome
39 :blush: Great
3 :cry: Sad
9 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)