महिला न्यायाधीशाचा बिना घटस्फोट दुसरा विवाह…

प्रकरंण हाय कोर्टात
जयपूर (राजस्थान ) – एक महिला न्यायाधीशाने पहिल्या पतीपासून घटस्फोट न घेता दुसरा विवाह केल्याचे प्रकरण राजस्थान हायकोर्टात गेले आहे. संबधित महिला अनुराधा दधीच आरजेएस (राजस्थान ज्युडिशियल सर्व्हिस) ऑफिसर असून सध्या बालोत्रा येथे अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी पदावर काम करत आहे.

अनुराधा दधीच यांचे पहिले पती अनुराग वर्मा यांनी राजस्थान हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. 10 एप्रिल 2013 रोजी अनुराधाशी आपला विवाह झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यावेळी अनुराधा जेडीएस परीक्षेची तयारी करत असल्याने हा विवाह गुप्त ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विवाहाची नोंदणी 29 जुलै रोजी करण्यात आली.

मात्र परीक्षा पास झाल्यानंतर ज्युडिशियल ऑफिसर बनलेल्या अनुराधाने एक दुसरे ज्युडिशियल ऑफिसर शिवधान सिंह यांच्याशी 24 जून 2017 रोजी विवाह केला. त्यांच्या विवाहाची नोंदणी 30 जून रोजी करण्यात आली.
जर पर्सनल लॉ परमिट नसेल, तर कोणताही सरकारी कर्मचारी कायदेशीर घटस्फोटाविना दुसरा विवाह करू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)