महिला धोरण, कायद्यांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार

कोल्हापूर : महिला धोरण आणि महिलांचे कायदे यांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. जिल्हा महिला सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी नितिन मस्के, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर, समिती सदस्या डॉ. प्रमिला जरग, शशिकला बोरा, साधना झाडबुक्के, डॉ. मंगला पाटील, डॉ. भारती पाटील, प्रियदर्शनी चोरगे, डॉ. कालिंदी राणभरे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महिला धोरणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेवून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, महिला धोरणानुसार महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी खाते प्रमुखांची असून या कामास संबंधित अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे. तसेच महिला विषयक कायद्यांची सर्व संबंधितांनी कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महिला धोरणाच्या अनुषंगाने महिलावरील अत्याचार व हिंस्सा यास प्रतिबंध, महिलांचे आरोग्य, महिलांचे शिक्षण व प्रशिक्षण, महिलांच्या उत्‍पादीत वस्तुसाठी वितरण व्यवस्था, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे संरक्षण, बाल विवाह प्रतिबंध उपाययोजना, महिलांची सुरक्षा व संरक्षण यासह हुंडा प्रतिबंध अधिनियम, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच संरक्षण याबाबीवरही अधिक लक्ष केंद्रीत करण्याची सूचना त्यानी केली.

अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत पोलीस विभागामार्फत धाडी टाकण्याची सूचना करुन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, देह विक्री करणाऱ्या महिलांचे सामाजिक सामायोजनाद्वारे त्यांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड अशा सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सूचना त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)