तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका: ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून भारतावर विजय

मुंबई – भारत, आस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघाच्या टी-20 तिरंगी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेची सलामीची लढत भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी झाली. मात्र यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून भारतावर विजय मिळवला आहे.

संबंधित वृत्ततिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय महिला संघाला सांगलीकर स्मृती मानधना (41चेंडूत 67 धावा) आणि कोल्हापूरकर अनुजा पाटील (21 चेंडूत 35 धावा) या दोघींनी चांगली फलंदाजी करत आव्हानात्मक टप्पा गाठून दिला. यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियासमोर 153 धावांचे आव्हान विजयासाठी दिले. मात्र ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 18.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताची झूलन गोस्वामी वगळता एकाही महिला गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. झूलने 4 षटकांमध्ये 30 धावा देत 3 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने 45 धावा करत डावाला आकार दिला. मेग लेनिंन 39 आणि एलसे विलोनीने नाबाद 35 धावा करुन विजय मिळवून दिला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)