महिला तहसीलदारांच्या पर्सवर चोरट्याचा डल्ला

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला तहसीलदाराच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पर्स व त्यातील दहा हजारांची रोकड चोरट्याने लंपास केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खळबळ उडाली.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अमिता विजय तळेकर-धुमाळ (वय 40, रा. सातारा) या दिवसभर त्यांच्या दालनात काम करत होत्या. दरम्यान, सायंकाळी बैठकीनिमित्ताने त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेल्या. त्यावेळी धुमाळ यांनी स्वत:ची पर्स टेबलावर ठेवून त्या बाहेर गेल्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केली. बैठक संपवून त्या दालनात आल्या असता त्यांच्या टेबलावर पर्स नसल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या पसरमध्ये दहा हजार रोख, बॅंकेचे एटीएम, पॅनकार्ड, आधारकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती.
याबाबत बुधवारी रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस नाईक गायकवाड तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)