महिला डॉक्‍टरची बदनामी करत खंडणीची मागणी

पाच डॉक्‍टरांवर गुन्हा : चार डॉक्‍टर परराज्यातील तर एक मुंबई आणि एक पुण्याचा
पुणे – शहरातील एका नामांकित महिला डॉक्‍टरची इमेलवरून बदनामी करत तिच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या देशभरातील नामांकित सहा डॉक्‍टरांविरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार डॉक्‍टर हे परराज्यातील असून एक मुंबई आणि एक पुण्याचा आहे.

पुण्यातील महिला डॉक्‍टरने दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. प्रदिप चौबे (65, रा. दिल्ली), डॉ. सुरेंद्र उगले (60, रा. हैद्राबाद), डॉ. राजेश खुल्लर (58, रा. दिल्ली), डॉ. अतुल पिटर (50, रा. दिल्ली), डॉ. मुफजल लकडावाला (47, रा. मुंबई) आणि श्रीहरी ढोरेपाटील (65, रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्‍टरांची नावे आहेत. हा प्रकार 26 जानेवारी ते 22 मार्च दरम्यान घडला. डॉ. चौबे, डॉ. उगले, डॉ.खुल्लर, डॉ. पिटर आणि पुण्यातील डॉक्‍टर श्रीहरी ढोरे-पाटील यांनी मिटींगमध्ये महिला डॉक्‍टरची बदनामी करून त्यांना धक्काबुक्की केली.

यापैकी पुण्यातील डॉक्‍टर ढोरे-पाटील यांनी मिटींमध्ये महिला डॉक्‍टरबद्दल अर्वाच्य भाषेचा देखील वापर केला होता; तर डॉ. लकडावाला यांनी महिला डॉक्‍टरला “20 लाख रुपये दे नाही तर तुझी बदनामी करू’ अशी धमकी दिली.
डॉ. चौबे हे लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. तसेच, एक अनुभवी डॉक्‍टर म्हणून चौबे यांची ओळख आहे. डॉ. उगले हे हैद्राबाद येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करतात. तर डॉ. खुल्लर हे देखील एमए जनरल सर्जन आहेत. डॉ. पीटर हे डीएनबी तर डॉ. लकडावाला एमएस जनरल सर्जन तसेच बॅरॅट्रीक सर्जन आहेत. गुन्हा दाखल झालेले पाचही डॉक्‍टर देशातील नामांकित डॉक्‍टर आहेत. श्रीहरी ढोरे-पाटील हे पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहीते अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)