महिला टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा; महाराष्ट्राच्या महिला संघाचा सौराष्ट्रवर दणदणीत विजय

पुणे – गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर त्रिशा हसबनीसच्या दमदार खेळीच्या जोरावर सौराष्ट्र महिला संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करताना महाराष्ट्राच्या महिला संघाने बीसीसीआयच्या 23 वर्षांखालील महिलांच्या टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या सौराष्ट्र महिला संघाचा डाव 19.5 षटकांत सर्वबाद 55 धावांत गुंडाळला गेला. त्यानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाने 13.1 षटकांत 3 बाद 57 धावा फटकावताना एकतर्फी विजयाची नोंद केली.

विजयासाठी 56 धावांच्या सोप्या आव्हानासमोर मानसी मगरे (8) व प्रियांका घोडके (7) लवकर बाद झाल्यामुळे महाराष्ट्राची सुरुवात निराशाजनक झाली. त्यातच लोणकर (6) धावबाद झाल्यामुळे महाराष्ट्राची छोटी घसरगुंडी झाली. परंतु त्रिशा हसबनीसने 41 चेंडूंत 3 चौकारांसह नाबाद 30 धावांची खेळी करताना चार्मीच्या साथीत महाराष्ट्राचा विजय साकार केला. सौराष्ट्रकडून मोधवाडिया व निमावत यांनी प्रत्यकी एक बळी घेतला.

त्याआधी निमावत (10) व सरस्वती (11) वगळता सौराष्ट्रच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या नोंदविता आली नाही. त्यामुळे सौराष्ट्रचा डाव 55 धावांत संपुष्टात आला. अवांतर 10 धावांनीही सौराष्ट्रच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्राकडून निकिता भोरने 15 धावांत 2 बळी घेतले. मगरे, पवार व सोनावणे यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना साथ दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)