महिला खेळाडूंसाठीही आयपीएलसारखी एखादी टी 20 लीग असावी – मिताली राज

मुंबई : पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे महिला खेळाडूंसाठीही आयपीएलच्या धर्तीवर एखादी टी 20 लीग असावी, अशी इच्छा महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केली आहे.ती एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.यावर्षी मितालीच्या नेतृत्वात टीम इंडियाने महिला वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.

गेल्या काही वर्षात आयपीएलमुळे पुरुषांच्या क्रिकेटला जो लाभ मिळाला आहे, तो महिला क्रिकेटलाही मिळावा आणि देशात मोठ्या प्रमाणावर महिला क्रिकेटपटू तयार व्हाव्यात, यासाठी महिला टी20 लीग सुरु व्हावी, अशी इच्छा मितालीने व्यक्त केली. ‘आयपीएलप्रमाणे महिलांसाठी टी 20 लीग सुरु झाली, तर मोठ्या प्रमाणावर महिला क्रिकेटपटू तयार होतील. महिला क्रिकेटचं भवितव्य उज्ज्वल आहे. असंही ती यावेळी म्हणाली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)