महिला क्रिकेट संघाची दुसरी फळी उभारणार 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवामुळे बीसीसीआयला जाग 
नवी दिल्ली  – भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या वर्षी विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना सर्वांनाच चकित केले होते. त्या स्पर्धेनंतरही महिला संघाची कामगिरी कमीअधिक प्रमाणात चांगलीच होती. इतकेच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातही विजय मिळविताना भारतीय महिलांनी अपेक्षेबाहेर कामगिरी बजावली होती.
नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून मायदेशातच पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर मात्र बीसीसीआयला खडबडून जाग आली आहे. इतकेच नव्हे तर पुरुष क्रिकेट संघाच्या धर्तीवर दर्जेदार खेळाडूंची दुसरी फळी उभी करणे आवश्‍यक असल्याचे बीसीसीआयला आता पटले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने महिलांच्या देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रक निश्‍चित करणे, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अगोदर संभाव्य खेळाडूंची निवड करून त्यानंतर अंतिम संघाची निवड करणे, तसेच भारत अ महिला संघाची निवड करून त्यांच्यासाठी परदेश दौऱ्यांचे व आंतरराष्ट्रीय सामन्यांचे नियोजन करणे असे निर्णय बीसीसीआयने घेतले आहेत.
बीसीसीआय एवढ्यावरच थांबणार नसून काही ठोस निर्णयांचे सूतोवाच करतानाच महिलांच्या राष्ट्रीय निवड समितीला काही गोष्टी तातडीने अमलात आणण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यात किमान दर्जाच्या वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज आणि यष्टीरक्षकांच्या संभाव्य नावांची यादीच तयार करण्याचा आदेश निवड समितीला बीसीसीआयने दिला आहे. या सर्व खेळाडूंची चाचणी मार्च महिनाअखेर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घेण्यात येणार असून त्यातून दुसऱ्या फळीतील संघासाठी महिला खेळाडूंची नावे निश्‍चित करण्यात येणार आहेत.
महिलांच्या राष्ट्रीय निवड समितीत डायना एडलजी, मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि प्रो. रत्नाकर शेट्टी (निमंत्रक) यांचा समावेश असून हेमलता काला निवड समितीच्या प्रमुख आहेत. मिताली राज किंवा झूलन गोस्वामी या वरिष्ठ खेळाडू गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळ खेळत असून त्या फार काळ खेळू शकणार नाहीत हे ध्यानात घेऊ’ त्यांची जागा गेण्यासाठी नव्या खेळाडूंचा शोध घेण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
महिला क्रिकेटच्या लोकप्रियतेत वाढ 
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये जालेल्या विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्यापासून भारतीय महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे व त्यात भरच पडत आहे. अधिकाधिख आंतरराष्ट्रीय संघ भारतीय महिलांशी मालिका खेळण्यास उत्सुक आहेत. बीसीसीआयने महिला क्रिकेटला पंखाखाली घेतल्यापासून महिला क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन आणि सुविधांमध्येही लक्षणीय भर पडली आहे. बीसीसीआयने 16 वर्षांखालील गटाचा नव्याने समावेश केल्यामुळे पालक मोठ्या प्रमाणात मुलींना क्रिकेटसाठी पाठवू लागले आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होत जाण्यासाठी महिला संघाला सातत्याने चांगली कामगिरी करण्याची गरज असल्याचे डायना एडलजी यांनी सांगितले. हरमनप्रीत कौर किंवा स्मृती मंधाना यांसारख्या खेळाडूंनी विराट कोहलीच्या धर्तीवर सातत्याने चांगली कामगिरी करम्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी दर्जेदार वेगवान आणि फिरकी गोलंदाज तयार होणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)