महिला क्रिकेट संघाचा 11 पासून श्रीलंका दौरा

दुबई: आयसीसीच्या महिला अजिंक्‍यपद स्पर्धेतील तिसऱ्या सत्रासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ 11 ते 16 सप्टेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंकेचा दौरा करणार असून मिताली राजकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

महिला विश्‍वचषक-2021 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान व न्यूझीलंड हे संघ अगोदरच पात्र ठरले असून बाकी चार स्थानांसाठी अखेरच्या चार संघांमध्ये असलेल्या भारत, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ पात्रता फेरीत खेळत आहेत. भारतीय महिला संघ सहा सामन्यांनंतर 4 गुणांसह सहाव्या स्थानी असून त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 2-1ने पराभव करत 4 गुण कमावले होते. श्रीलंकेला अद्याप एकही गुण कमावता आलेला नाही. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पराभवातून पुनरागमन करण्याची, तर श्रीलंकेच्या संघासाठी मायदेशात होणाऱ्या या मालिकेत आपल्या गुणांचे खाते उघडण्याची संधी आहे.

भारतीय संघ या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने खेळणार असून त्यातील पहिला एकदिवसीय सामना 11 सप्टेंबर रोजी गॅले स्टेडियम येथे होणार आहे, तर दुसरा सामना सामना 13 सप्टेंबर रोजी गॅले स्टेडियम येथेच होणार असून अखेरचा सामना 16 सप्टेंबर रोजी कटुनायके स्टेडियम येथे होनार आहे.

भारतीय महिला संघ – मिताली राज (कर्णधार), तान्या भाटिया, एकता बिश्‍त, राजेश्‍वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, दयालन हेमलता, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मंधाना, शिखा पांडे, पूनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्झ, दीप्ती शर्मा व पूनम यादव.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)