महिला क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाचा नवा विक्रम

मुंबई : सांगलीच्या स्मृती मंधानाने मुंबईत सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मोठा विक्रम रचला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिने 40 चेंडूत 76 धावांची स्फोटक खेळी केली. विशेष म्हणजे तिने केवळ 25 चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण केले.

यासोबतच स्मृतीने महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम गाजवला. शिवाय सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारी ती आशियातील पहिलीच महिला खेळाडू ठरली. तीन दिवसांपूर्वीच तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 30 चेंडूत अर्धशत झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने पूर्ण केलेले स्मृतीचे हे चौथे अर्धशतक आहे. यापूर्वी न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनने 18 चेंडूत शतक केले होते.

* महिला क्रिकेटमधील वेगवान अर्धशतके
* सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड, विरुद्ध भारत), 18 चेंडू, 2005 साली
* डिएंड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज, विरुद्ध ऑस्ट्रेलिया), 22 चेंडू, 2009 साली
* रेचल प्रीस्ट (न्यूझीलंड, विरुद्ध भारत), 22 चेंडू, 2015 साली
* स्मृती मंधाना (भारत, विरुद्ध इंग्लंड), 25 चेंडू


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)