महिला कृतिशील कार्यक्रमात सहभागी झाल्यास देशाचे आर्थिक चित्र बदलेल- तुकाराम गायकवाड

बचतगट बॅंकांना जोडण्याची कार्यशाळा

नगर: बचत गटातील महिलांनी कृतिशील कार्यक्रमासाठी थोडा वेळ दिला तर देशाचे आर्थिक चित्र नक्की बदलेल असे प्रतिपादन अग्रणी बॅंकेचे महाव्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्ययं सहाय्यता बचत गटांचे बॅंकेशी जोडण्यासाठी नाबार्डच्यावतीने आयोजित कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक शिलकुमार जगताप मा.वी.म. चे जिल्हा समन्वयक संजय गायकवाड, जिल्हा सहकारी बॅंकेचे सुनील काळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थेचे व महिला बचत गटाचे प्रतिनिधी या कार्यशाळेस उपस्थित होते.

महिला बचत गटांना मार्गदर्शन करतांना तुकाराम गायकवाड पुढे म्हणाले, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून बचत गटातील महिलांनी काम केले तर आपल्या हाती निश्‍चितपणे काहीतरी लागेल त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वयंस्फूर्तीने उद्योग व्यवसाय करावा व त्यातूनच आपली आणि देशाची प्रगती साधावी. बचत गट आणि बॅंक या मधील संबंध अधिक दृढ होण्यासाठी बॅंक सखी सारख्या योजनांचे प्रशिक्षण महिलांनी घ्यावे, व बचत गट आणि बॅंक यामधील दुवा म्हणून काम करावे.

महिलांनी शेळी, गायी, म्हशींच्या दूध व्यवसाय, किंवा तुती ची लागवड करून रेशीम उद्योगासारखे इतर व्यवसाय निवडावेत त्यासाठी अग्रणी बॅंकेची मदत घ्यावी असे ते म्हणाले. नाबार्ड चे शिलकुमार जगताप म्हणाले आपल्या देशातील लाखाहून अधिक बचतगट हे बॅंकेच्या सहकार्यामुळे कार्यरत आहेत. बचतगटांचे काम अधिक गतिमान व कार्यक्षम होण्यासाठी महिलांना नवीन योजनांची माहिती करून देणे, बचत गटात काम करतांना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी, समाजाची नाडी कशी ओळखवावी याबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

संयुक्त देयता समूह, बचत गटांचे ग्रेडेशन, स्वयंसेवी संस्थांची भुमीका व कर्तव्ये बॅंकांचे सहकार्य कसे घ्यावे याबाबत मा. वि. म. चे जिल्हा समन्वयक संजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. नवजीवन प्रतिष्ठाण चे अध्यक्ष राजेंद्र पवार, संगीता पवार यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)