नवी दिल्ली – हरियानातील या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून त्यांनी या प्रकरणात हरियाना पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि त्यात पोलिसांनी केलेली कारवाई याची माहिती त्वरीत आम्हाला सादर करा असे महिला आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या घटनेचा तीव्र निषेधही केला आहे. ही मुलगी अत्यंत हुशार असून तिचा सीबीएसई परिक्षेतील यशाबद्दल राज्य सरकार तर्फे सत्कारहीं करण्यात आला होता. दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महिला आयोगाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)