महिला आघाडीच्या प्रमुखपदी स्वाती ढमाले

पिरंगुट – पुणे जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी अबंडवेट (ता. मुळशी) येथील स्वाती संपत ढमाले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे भोर, वेल्हा, मुळशी आणि दौंड या चार तालुक्‍याची जबाबदारी देण्यात आली आहे. स्वाती ढमाले या आदर्श गाव ग्रामपंचायत अबंडवेटच्या माजी सरपंच असून यापूर्वी शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपसंघटक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून ढमाले यांनी मुळशीत गर्भवती महिलांना पोषण आहार तसेच गरिब कुटूंबातील मुलीसाठी स्व.बाळासाहेब ठाकरे दत्तक योजना राबविल्या आहेत. स्वाती ढमाले यांच्या कामाची दखल घेऊन महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख पद देण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत,अनिल देसाई, रविंद्र मिर्लेकर,संपर्क प्रमुख सत्यवान उभे, महिला संपर्क प्रमुख आशाताई मेमाडी, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, कुलदिप कोंडे यांनी विशेष प्रयत्न केले. भोर, वेल्हा, मुळशी आणि दौंड तालुक्‍यातील महिलांना सबलीकरणासाठी स्वतंत्र व्यवसाय केंद सुरू करणार असल्याचे स्वाती ढमाले यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)