महिला अ संघाचा सलग दुसरा पराभव 

टी-20 क्रिकेट सराव सामना 
मुंबई  – इंग्लंडच्या महिला संघाने भारतीय महिला अ संघाचा दुसऱ्या टी-20 सराव सामन्यात 6 गडी राखून पराभव करताना दोन्ही सराव सामन्यांत वर्चस्व गाजवले. भारतीय महिला अ संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला. पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला अ संघाला 45 धावांनी पराभूत केले होते.
भारतीय महिला संघाने आज नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा डाव निर्धारित 20 षटकांमध्ये नऊ बाद 85 धावांवर रोखला गेला.प्रत्युत्तरात फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने निर्धारित लक्ष्य पार केल्यानंतरही आपली फलंदाजी सुरू ठेवताना 20 षटकांत 4 बाद 210 धावा फटकावीत फलंदाजीचा सराव करून घेतला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला अ संघाकडून वेलास्वामी वनिता वगळता कोणतीही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर टिकाव धरू शकली नाही. सामन्यात भारताच्या केवळ दोन खेळाडूंना दोन अंकी धावा करता आल्या, तर चार फलंदाजांना भोपळादेखील फोडता आला नाही. वनिताने 40 धावा करताना एकाकी झुंज दिली. इंग्लंडच्या केटी जॉर्जने केवळ 6 धावा देत 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने निर्धारित लक्ष्य पूर्ण केल्यानंतरही आपला सराव चालू ठेवत 20 षटकांत 4 बाद 210 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून नताली स्किव्हर आणि डॅनिअली वॅट यांनी उत्कृष्ट फलंदाजी करताना अनुक्रमे 54 आणि 46 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – भारत अ 20 षटकांत नऊ बाद 85 (वेलास्वामी वनिथा – 40, केटी जॉर्ज – 6-4) पराभूत विरुद्ध इंग्लंड 20 षटकांत 4 बाद 210 (नताली स्किव्हर 54, डॅनिअली वॅट 46, शांती कुमारी 34-2)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)